नातवाची ई-मेलवर परवानगी; पोलिसांनी चेन्नईच्या वृद्धावर केले अंत्यसंस्कार; वृद्धाजवळील सव्वा लाख कोरोना निधीसाठी

पुणे. त्र्यंबकेश्वरला तीर्थयात्रेवर निघालेल्या चेन्नईचे शिवा स्वामीगल (९६) या वृद्धाचा बारामती येथील रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातवाने ई-मेलवर दिलेल्या परवानगीने बारामती पोलिसांनीच अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडवले.


स्वामीगल हे लॉकडाऊन होण्यापू्र्वीच त्र्यंबकेश्वरला निघाले होते, परंतु भिगवण (ता.इंदापूर) रेल्वेस्थानकावर बेशुद्धावस्थेत ते पोलिसांना आढळले होते. त्यांना तत्काळ भिगवण व नंतर बारामती शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात अाले. रविवार, ५ एप्रिल रोजी स्वामीगल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.


बेशुद्ध पडण्यापूर्वी वृद्धाने आपला नातू अरुण याच्याशी तामिळनाडूमध्ये संपर्क साधून आपण पुणे जिल्ह्यातून बोलत असल्याचे त्याला सांगितले होते. त्यावरून नातवाने महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर संपर्क साधला. महाराष्ट्र पोलिसांच्या मुख्यालयातून बारामती पोलिसांशी संपर्क झाला. स्वामीगल यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी नातू अरुण यांच्याशी पुन्हा फोनद्वारे संपर्क साधला. मात्र लॉकडाऊनमुळे नातवाने पोलिसांनाच अंत्यसंस्कार करण्याची विनंती केल्यानंतर पोलिसांनी मेल मागवून घेतला.


वृद्धाजवळील सव्वा लाख कोरोना निधीसाठी


वृद्धाच्या खिशात १ लाख ३५ हजार रुपये असल्याची माहितीही नातवाने पोलिसांना दिली. हे पैसे राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या मदत निधीसाठी दान द्यावे, अशी इच्छाही त्याने पोलिसांजवळ व्यक्त केली. त्यानुसार दान करण्यात येणार आहेत.


Popular posts
एनआव्हीत आठ तासात होणारी कोरोना चाचणी 2 तासात करणारे टेस्टिंग किट, आयसीएमआरची परवानगी
झोप उडवणारी खप्न हवीत : सोमनाथ गायकवाड नाझरा विद्यामंदिर परिवाराचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डॅशबाेर्ड तंत्रज्ञानामुळे पुण्यात 40 कोरोनाग्रस्त सापडले; राज्यात प्रथमच पुणे शहरामध्ये ठरावीक भाग सील करण्याची अंमलबजावणी
पिकांचे नुकसान : 'आधीच कोरोना, पाऊसही आवरेना...' औरंगाबाद, नाशिक, खान्देश, पुण्यात जोरदार सरी